लोहारा/प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील जनतेसाठी दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यां‘या मार्फत सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयास अद्यावत सी- आर्म, अँलन काँटरी शस्त्रक्रिया टेबल व कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन भेट देण्यात आली तसेच विपुला माता व बाल संगोपन कक्षात स्त्री जन्माचे स्वागत म्हणून, स्त्री जन्मलेल्या मातेस भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर जनरल इन्शुरन्स कंपनीचे असिस्टंट जनरल मँनेजर नामदेव कदम यांनी रूग्ण व त्यां‘या नातेवाईकांशी संवाद सधुन उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ उठविण्याचे आवाहन केले.
यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.आर.बी.जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्तविक स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. यावेळी नामदेव कदम यांची पत्नी श्रीमती प्रतिभा नामदेव कदम, कार्यक्रम प्रमुख श्रीमती संगीता दश्मोपात्रा, उमेश तांडेल यां‘यासोबत सर्व वैद्यकीय अधिकारी, स्पर्श रुग्णालयाचे कर्मचारी, ग्रामस्थ, मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ.आर. बी.जोशी यांनी आभार मानले.