उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वैद्यकीय महाविद्यालय व भव्य रूग्णालय उस्मानाबाद येथे सुरू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून काही प्रशासकीय बाबीं प्रलंबित आहेत. त्याबाबत लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्र मार्गी लावू, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकारांना दिली.
मंत्री देशमुख गुरूवारी उस्मानाबादेत आले होते. त्यांनी कॉंग्रेस भवनला भेट देऊन कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करताना गल्ली तिथे कॉंग्रेस या प्रमाणे योजना राबवा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. मराठवाडयासाठी वॉटर ग्रेडची योजना फडणवीस सरकार ने केली होती. या योजनेबाबत आम्ही अभ्यास करत आहोत. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. २१ टीएमसी पाण्यासंदर्भात आम्ही कटीबध्द आहोत, असे साचेबध्द उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले. मराठवाडयावर विकासाबाबत अन्याय होणार नाही, हे सांगण्यास ही ते  विसरले नाहीत.
 मंत्री देशमुख यांनी दुपारी अडीच वाजता आयुर्वेदीक महाविद्यालयामध्ये सर्व अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या ठिकाणी एका प्रशस्त हॉलमध्ये सोय ही करण्यात आली होती. परंतू ऐनवेळी मंत्री देशमुख यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयामधील बैठक एका कॅबिनमध्ये घेऊन कांही मिनिटात उरकली. आ.कैलास पाटील, आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे, अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी आ.वैजनाथ शिंदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपकुमार शेगुलवार,सहाय्यक अधिष्ठाता डॉ.एस.एल गुप्ता,डॉ.कादरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे, अदिसह रुग्णांलयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय चालू करण्याची मागणी 
उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालु शैक्षणिक वर्षात सुरु करण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शैक्षणिक मंत्री  अमीत देशमुख यांना देण्यात आले आहे.
यावेळी  समितीचे तथा नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, बाबासाहेब आप्पा बनसोडे, गणेश रानबा वाघमारे,पुष्पकांत माळाळे, संजय गजधने, सोमनाथ गायकवाड, रमाकांत धावारे, देवानंद एडके,मच्छिंद्र चव्हाण, बाळु कांबळे,सलीम शेख,मुस्ताक शेख अन्य इतर उपस्थित होते.
हे विषय लागणार मार्गी
पदव्युत्तर विद्याथ्र्यासाठी इमारत, वाचन कक्ष, औषधी वनस्पती लागवड करण्यासाठी जागा, मुलींच्या स्वतंत्र वस्तीगृहासाठी पाच एकर जागा, क्रीडांगणासाठी पाच एकर जागा, ग्रंथालय व वाचनकक्षसाठी इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी आयुष मंत्रालयाच्या संचालकांना दिले त्याबरोबरच 100 विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंत्रालय स्तरावर येत्या अधिवेशन काळात स्वतंत्र बैठक घेवून हा विषय मार्गी लावणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
 
Top