कळंब /प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात अन्नदान करणारे व मिरवणूक काढणारे मंडळाचा स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
शहरातील कथले चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसेवा तालीम संघ व महिला रॅली, स्वराज्य प्रतिष्ठान,स्वराज्यरक्षक संभाजीराजे प्रतिष्ठान, जलमंदिर प्रतिष्ठान, शिवशाही प्रतिष्ठान, शिव छत्रपती प्रतिष्ठान, शिवाई प्रतिष्ठान, सम्राट ग्रुप,चालक मालक संघटना,ग्रुप व आदींना झाड व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रा संजय घुले, शाम खबाले, डॉ.रुपेश कवडे, महादेव (महाराज) आडसूळ, माधवसींग राजपूत, प्रकाश भडंगे, शितलकुमार घोंगडे, शिवाजी गिड्डे, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी, प्रवीण तांबडे, कथले युवक आघाडी चे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, गोविंद खंडेलवाल,भाऊसाहेब शिंदे,अशोक फल्ले,यश सुराणा, दीपक साखरे, सोमनाथ जगताप, नवनाथ पुरी, बालाजी चादर, ऋषीकेश साखरे, मनोज फल्ले,संकेत भोरे,धर्मराज पुरी, आशितोष गालफाडे, वैभव कुपकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित बलदोटा यांनी तर आभार बाळासाहेब कथले यांनी मानले

 
Top