उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त येथील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शनिवारी (दि.29) वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण चार गटामध्ये ही स्पर्धा होणार असून सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुलमध्ये सकाळी 10 वाजेपासून स्पर्धेस सुरूवात होणार आहे. यामध्ये इयत्ता तिसरी ते चौथी गटासाठी शिवरायांचे बालपण व शिक्षण, सायकल वापरु, निरोगी राहु, सर्वधर्म समभाव पाळु, देशात शांतता नांदवु , पाचवी ते सातवीसाठी एक आदर्श शासनकर्ता-छत्रपती शिवाजी महाराज , शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र, आज राजे असते तर समाज व्यवस्था काय असती?, आठवी ते दहावी गटासाठी वैज्ञानिक दृष्टीकोण काळाची गरज, देशाला नक्की कोण तारेल?, महापुरुषांचे विचार की, बुवाबापूंचे चमत्कार?, स्त्री सन्मानासाठी शिवरायांचे विचार, 11 वी ते पदवीधर खुला गटाकरिता आजच्या तरुणाईची दशा व दिशा, लढाई तीच्या अस्तिवासाठी, छत्रपती शिवराय आणि त्यांचे शेतकरी धोरण, आजच्या जिजाऊला, शिवबा घडविताना नक्की काय करावे लागेल?, राजकारणात महिलांचे नगण्य स्थान व त्यावर उपाय या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ यांना प्रमाणपत्र व उत्कृष्ट वक्ता ट्रॉफी. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.