उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) जिल्हा परिषद मतदारसंघात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा (दि18) मंगळवारी दौरा केला. यावेळी तीर्थ क्षेत्र विकास निधीतून 22 लाख रुपये येथील अकुदेवी मंदिराच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांनी केले,
यावेळी आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात सक्षणा सलगर यांनी जिल्हा परिषद मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. सलगर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समुद्रवाणी येथील आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी, पाडोळी(आ) येथील आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांच्या वसाहतीच्या बांधकामासाठी भरघोस निधी मिळविला, तसेच टाकळी(बें) येथील तेरणा आणि सवळा नदी खोलीकरणा साठी सतत पाठपुरावा करून या दोन्ही नदीचे अडीच किमी काम पूर्ण करून घेतले, समाजकल्याणच्या विविध योजनेचा या मतदारसंघातील नागरीकांना लाभ मिळवून दिला. पुढे बोलताना ते असेही म्हणाले सक्षणा सलगर आणि माझ्यात बरेच साम्य आहे, आम्हा दोघांची राजकारणाची सुरुवात ही जिल्हा परिषदेच्या निवडणूकी पासून झाली आणि ही जन्मभूमी नसलेल्या मतदारसंघातुन आम्ही दोघेही निवडून आलो,आतापर्यंत पाडोळी (आ) जिल्हा परिषद संघात ताईचे काम कौतुकास्पद आहे.सक्षणानी मतदारसंघात विकासाचा सपाट लावला आहे, नक्कीच आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, याचा आपल्या मतदारसंघाला फायदा होईल,असे ही ते म्हणाले.
तत्पूर्वी पाडोळी(आ) येथील नागरिकांच्या वतीने आमदार पवार यांचा जंगी सत्कार करण्यात आला, त्यानंतर येथील युवक शेतक-यांनी सुरू केलेली जरबेरा शेती, आणि दुग्ध व्यवसायाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रताप पाटील,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रशांत कवडे, पंकज बोराडे,सुशील शेळके, शंतनु खंदारे, धीरज घुटे, चित्राव गोरे, निलेश बारखडे,वामन गाते, बाबुराव पुजारी, सतीश एकंडे, सतीश देटे,अजित पवार, व्यंकट गुंड, प्रशांत सोनटक्के, ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, दिगंबर गायकवाड, मंगेश दळवे, काकासाहेब सोनटक्के,बळीराम खटके, श्रीमंत पाटील,नंदकिशोर हजारे,सूरज देटे, अमोल सुर्यवंशी, श्रीधर नरवडे,अमोल मोरेयांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.