उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मिशन स्कॉलरशिप अंतर्गत   दि. 11 फेब्रुवारी 2020 रोजी मिशन स्कॉलरशिप 2020 बीट- मंगरुळ अंतर्गत 10 वी सराव चाचणी जि.प.कन्या प्रा.शाळा, मंगरुळ येथे पार पडली. ही चाचणी या वर्षातील शेवटची चाचणी होती. या परीक्षेसाठी बीटमधील इ. 5 वीचे 72 तर इ. 8 वीचे 30 विद्यार्थी उपस्थित होते. स्कॉलरशिप बीटस्तरीय चाचणी परिक्षा शिक्षण विस्तार अधिकारी मल्हार माने यांच्या मार्गदर्शनाखाली व  बापूराव मोरे सर यांच्या पुढाकाराने झाली. आता 16 फेब्रुवारी 2020 रोजी होणा-या अंतिम परीक्षेत कोणत्या शाळांचे किती विद्यार्थी बाजी मारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मिशन स्कॉलरशिप बीट- मंगरुळ अंतर्गत बीटस्तरीय अंतिम चाचणीत इयत्ता पाचवी मधून स्वरांजली गायकवाड इयत्ता आठवी मधून प्रज्ञा पाटील प्रथम क्रमांक प्राप्त केला. गुणवतांना बक्षीस वितरण केंद्रप्रमुख श्री. वाले सर यांच्या हस्ते करण्यात आले. या शेवटच्या चाचणीमध्ये खूपच चुरस पाहायला मिळाली. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसई, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा ताड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी आ. आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती या शाळांनी अनपेक्षितपणे आघाडी घेतली आहे. तसेच आतापर्यंतच्या सर्वच चाचण्यांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्री, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मंगरूळ आणि जिल्हा परिषद प्रशाला आरळी बुदृक या शाळांचा दबदबा राहिला आहे.
 यासाठी श्री. वाघमोडे सर  व श्रीम. सोनार मॅडम ,  कोलते सर,  काळे सर,  जेटीथोर सर, हत्तुरे सर, श्री. डोंबाळे सर, श्री. सोमवंशी सर याने सहकार्य केले. यावेळी श्री. धर्मे सर यांनी ही विद्याथ्र्यांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.  परीक्षेचे सहनियंत्रक म्हणून श्री. सुसेन सुरवसे यांनी कामकाज पाहिले.
 
Top