
तिर्थक्षेञ तुळजापूरच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत सचिन रोचकरी हे बिनविरोध निवडून आहेत आहेत. सभा अध्यक्ष तथा पिठासन अधिकारी योगिता कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेस १९ सदस्य उपस्थितीत होते.
उपनगराध्यक्ष पदासठी युवा उद्योजक नगरसेवक सचिन रोचकरी यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाच उमेदवाराचे दोन अर्ज आल्याने व ते छाननीत वैध ठरल्याने पीठासन अधिकारी योगिता कोल्हे यांनी उपनगराध्यक्ष पदी सचिन रोचकरी यांची निवडून आल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपनगराध्यक्ष रोचकरी यांचा पीठासन अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी सत्कार केला
यावेळी पुर्व उपनगराध्यक्ष बापुसाहेब कणे, विनोद गंगणे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, विशाल रोचकरी, राजेश शिंदे , नगरसेवक संतोष कदम, विजय कंदले, सचिन पाटील, किशोर साठे , वैशाली साठे, हेमा कदम, अर्पणा नाईक, मंजुषा देशमाने, शारदा भोसले, पंडीत जगदाळे, भारती गवळी, राहुल खपले सुनिल रोचकरी, अश्विनी रोचकरी, अमर मगर नानासाहेब, लोंढे अभिजीत कदम आदींची उपस्थिती थी । या सभेचे कामकाज मुख्याधिकारी अशिष लोकरे , महादेव सोनार, वैभव अंधार,े सुधीर रोचकरी यांनी पाहिले.