परांडा /प्रतिनिधी-
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सिटीजन फीडबॅकला विद्याथ्र्यामार्फत उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या.  व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिव, प्रा.डॉ.विशाल जाधव, प्रा.डि.व्ही.मांजरे, प्रा.डॉ.अक्षय घूमरे, प्रा.अमर गोरे-पाटील, शाबाद पठाण ,  बालाजी यादव ,संगणक चालक योगेश हिवरे, नगर रचना सहाय्यक प्रवीण पवार, शहर समन्वयक महेश शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वच्छतेविषयी सर्व नागरिकांना माहिती देणे,  स्वच्छ सर्वेक्षणाचे गुणवत्ते द्वारे शासनाकडे माहिती पाठवणे आणि या माहितीच्या द्वारे महाराष्ट्राला राज्याला प्रथम क्रक्रमांक प्राप्त करणे हे या स्वच्छ सर्वेक्षण सिटीजन फिडबॅक कार्यक्रम याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्राचार्या  डॉ.दीपा सावळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण सिटीजन यासंदर्भात विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. आपली माहिती विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे द्यावी व परंडा शहर हे 100 टक्के स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रक्रमांक प्राप्त करेल, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,असे त्यांनी सांगितले . यावेळी शहर समन्वयक महेश एकशिंगे यांनी विद्याथ्र्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ.विशाल जाधव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top