तुळजापूर प्रतिनिधी-
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात ग्रामिण भागातील विद्यार्थी आज पुढे येताना दिसत आहे.विद्याथ्र्यांनी सतत दर्जेदार ग्रंथ वाचली पाहिजेत जेणेकरून व्यक्तित्वसुध्दा दर्जेदार असेच निर्माण होईल.आज समाजात सकारात्मक परिवर्तन होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना भविष्यात ऊत्कृष्ठ असे कार्य करण्यासाठी प्रशासकीय सेवेत भरपूर वाव आहे.आजच्या काळात नविन तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी स्वताच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर नवनिर्मिती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी केले.
तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूच्या रष्ट्रीय सेवा योजना अधिक दोन स्तर विभाग, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, लातूर आणि श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर तसेच हिमछाया प्रतिष्ठान तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रा.से.यो.विभागातील स्वयंसेवकांसाठी विभागीय नेतृत्व गुण विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटने जिल्हा पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन सांळुके, शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे,हिमछाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. धनंजय लोंढ, प्रा.डाँ संदीपान जगदाळे, प्रा. एम. एस हणमंतकर, प्रा. मोहन राठोड, शिवभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविणराजे कदम, श्रीमती तृप्ती अंधारे, शिक्षणविस्तार अधिकारी,लातूर,विभागीय समन्वयक प्रा.डॉ.संदिपान जगदाळे लातूर,प्रा.एम.एस.हणमंतकर नांदेड,प्रा.मोहन राठोड उस्मानाबाद,प्रा.सतिश वडगावकर तुळजापूर, प्रा.अ.ना.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सज्जनराव साळुंके, डॉ. एस.एम.मणेर यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिमछाया प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रा.धनंजय लोंढे , प्रा.आशपाक आतार,प्रा.सविता कदम,प्रा.सोनवणे,प्रा.बाळासाहेब कुकडे,प्रा.डॉ.बालाजी गुंड,प्रा.आबासाहेब गायकवाड यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रा.डॉ.संदिपान जगदाळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.जे.बी. क्षीरसागर यांनी केले. आभार प्रा.एस.पी.पाटील यांनी मानले. शिबिरासाठी उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथुन एकुण 65 विद्याथ्र्यांनी हजेरी लावली होती. एकुण 40 संघ या शिबिरासाठी तुळजापूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत.