उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरासह परिसरातून मागील काही महिन्यात अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याचा तपास होऊन पोलिसांनी शोधून काढलेल्या शहर व आनंदनगर पोलिस ठाण्यांतर्गत 15 दुचाकी  पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
आनंदनगर पोलिस ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, शहर ठाण्याचे निरीक्षक कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील कालावधील उस्मानाबाद शहर ठाणे व आनंदनगर पोलिस ठाणे हद्दीतून अनेक दुचाकी चोरीस गेल्या होत्या. यामध्ये शहर हद्दीतील 10 व आनंदनगर हद्दीतील 5 अशा एकूण 15 मोटारसायकली रात्रीच्या वेळी चोरून कासारशिरसी, निलंगा, लातूर या परीसरात विकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन व अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, लातूरचे उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या विशेष पथकाने गोपनीय माहिती काढून याप्रकरणी चार तरुणांना अटक करत त्यांच्याकडून चोरीतील सदरच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या होत्या. या मोटारसायकली शनिवारी मुळ मालकांना पोलिस अधीक्षक व नगराध्यक्ष यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. ही वाहने जप्त करण्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलिस फौजदार आनंदे, हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण, पोलिस नाईक सुधाकर भांगे, नितीन तुपे, अशिष पाटील, महिला पोलिस नाईक टिळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

 
Top