उस्मानाबाद /प्रतिनिधी-
स्वतंत्र विद्यापिठ निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.संजय भोरे यांनी राज्याचे केबिनेट मंत्री अॅड.आदित्य ठाकरे यांची मंत्रालय,मुंबई येथे भेट घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र विध्यापिठ मिळावे या मागणीचे निवेदन दिले.
उस्मानाबाद येथे 2004 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे उपकेंद्र आहे.वास्तविक अद्याप पर्यंत या उपकेंद्राचे रुपांतर पुर्ण विद्यापीठात होणे आवश्यक होते.  सध्या उपकेंद्राच्या मालकीची 60 एकर जागा असुन भव्य दिव्य प्रशासकीय ईमारतीसह सर्व सोयींनी परिपूर्ण असे उपकेंद्र आहे. त्यामुळे सुरुवातिला फार मोठी आर्थिक गुंतवणूक न करता सदर विद्यापिठाचे रुपांतर पुर्ण विद्यापिठात करता येणे शक्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असुन ते उच्च व तंत्र शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणीच उच्च व तंत्र शिक्षणाची दारे उघडी करून देण्यासाठी विद्यापिठाची अत्यावश्यक गरज असुन या संदर्भात सकारात्मक विचार करण्यासंदर्भात विनंती केली.यावर आदित्य ठाकरे यांनी आपण यासंदर्भात लवकरच पाउले उचलु,असे आश्वस्त करुन सदर निवेदन मुख्यमंत्री कार्यालयास सादर करण्यासंदर्भातच्या सुचना त्यांच्या सचिवांना केल्या आहेत.
 
Top