लोहारा/प्रतिनिधी
 शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये  दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही.रमन यांच्या जयंतीनिमीत्त विज्ञान प्रयोगशाळा व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शि.वि.अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी डॉ.सी. व्हीं.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ.हेमंत श्रीगिरे, भीमाशंकर डोकडे,  सतीश जट्टे, पत्रकार गिरीष भगत, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, आदी उपस्थित होते.  यावेळी  विद्याथ्र्यांनी विविध प्रयोग सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  साक्षी महामुनी व वृषाली गंगणे यांनी केले. तर आभार सविता जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी विज्ञान विषय शिक्षक रामेश्वर पंजरकर, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, परमेश्वर जाधव, अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रा.मुकुंद रसाळ, प्रा.यशवंत चंदनशिवे, सुरेश सोमवंशी, गणेश हिप्परगेकर, विजय ढगे, लक्ष्मण भोंडवे  यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 
Top