तुळजापूर/प्रतिनिधी-
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने अवैध धंद्या विरोधात शनिवार दि.1 रोजी केलेल्या कारवाईत स्कुटीतुन दारु घेवुन जाताना बलभिम सगट सह त्यास मदत करणा-या दत्ता राऊत यास ताब्यात घेवुन दारुचा बाटल्यासह 39400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या कर्मचा-यांनी मिळालेल्या माहिती नुसार आपली यंत्रणा शहरात सक्रीय केली. यावेळी शहरातील परमेश्वर लॉज समोरून स्कुटी (एमएच २५ एपी ३४२१) या वाहनाद्वारे अवैधरित्या दारूची वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी बलभिम सगट व त्याचा सहकारी दत्ता राऊत यांच्या जवळून टॅंगोच्या ४८ बाटल्या सहीत एकुण 39400रु पयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टीपरसे यांच्या मार्गदर्शनखाली पो काँ शेख , राऊत, घुसिंगे यांनी केली.