तुळजापूर/प्रतिनिधी-
छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी कार्यालयात गैरहजर राहणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी सुनिल घाडगे अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार जनआंदोन न्यास सदस्य यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १९ फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी केली जाते. परंतू या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपअधीक्षक डोईफोडे हे गैरजर होते. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 
Top