तुळजापूर/ प्रतिनिधी-
छञपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धचे उद्घाटन तुळजापूरनगरीचे नगराध्यक्ष  सचिन रोचकरी यांच्या हस्ते  व  सिनेअभिनेते निखिल राऊत, भाजपा नेते नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, नगरसेवक सुनिल रोचकरी,  शिवभवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण कदम, जाणता राजा युवा मंचाचे माजी अध्यक्ष संजय लोंढे, इंद्रजीत सांळुके, पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, भाजपा मिडीया जिल्हा उपाध्यक्ष संजय खुरुद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी आई तुळजाभवानी, छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठाचे पुजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. सुञसंचलन चंद्रकांत कोकाटे यांनी केले. राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक अमोल कुतवळ, अध्यक्ष राहुल भालेकर, उपाध्यक्ष विजय पाठक, उपाध्यक्ष सोमनाथ मस्के, खजिनदार शुभम खोले, खजिनदार रजनीकांत शिंदे, सचिव शुभम दहीहंडे, सभासद अभिजित कुतवळ, नागेश किवडे, सुदर्शन वाघमारे, गौरव साळुंके, राजाभाऊ चोपदार, नितीन मस्के, प्रसाद प्रयाग, प्रतीक प्रयाग, सारंग कावरे, हरिभाऊ साळुंके, दीपक साळुंके, आकाश भालेकर, मंगेश साळुंके, कुणाल भालेकर,अनिकेत कोंडो, बंटी भालेकर, दत्ता बेंद्रे, बालाजी भूमकर, सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.
नृत्याच्या अदाकारीने जिंकली रसिकांची मने
या स्पर्धेतील पहिल्या दिवसी राज्यातुन आलेल्या कलाकरांनी सुरेख नृत्याचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांचे मने जिंकली तसेच लावणी गटातील छोटया व मोठ्या कलाकारांनी खास करून महिला रसिकांची मने जिंकली.स्पर्धेच्या प्रारंभी चिमुकल्या मुलींने नृत्य सादर केले.
 
Top