तुळजापूर/प्रतिनिधी -
शहरातील शासकीय विश्रामगृहात  राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,  माजी आमदार  नरेंद्र बोरगावकर, गोकुळ शिंदे,  जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे,  संजय मामा निंबाळकर, सुरेश आप्पा पाटील ,  विजय सरडे,  उत्तम लोमट,  दिंगबर खराडे,  नगरपरिषदेचे गटनेते  संतोष परमेश्वर, भारत रोचकरी,  धनंजय पाटील,  अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फिरोज पटाण्, आरिफ बागवान, तैफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जीवन गोरे म्हणाले की, पक्षवाढीसाठी कार्यकत्र्यांनी कामाला लागावे, लवकरच पदाधिका-याच्या निवडी जाहीर करण्यात येतील.
बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी महेंद्र धुरगुडे, गोकुळ शिंदे, धनंजय पाटील, महेश कदम, अशोक जाधव, शहराध्यक्ष पदासाठी अमर चोपदार, नगरसेवक गणेश कदम,  संदीप गंगणे, बबन गावडे, खंडू जाधव, सचिन कदम यांनी मागणी केली.
यावेळी शशीकांत नवले, गणेश नन्नवरे , महेश चोपदार, चेतन शिंदे, गोरख पवार,  आमर चोपदार,  आभय माने, अशोक जाधव, शरद जगदाळे , आप्पा पवार,  शशी नवले, महेश क्षीरसागर,  गणेश नन्नवरे आदीसह तालुका व शहरातील विविध सेलचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जि.प सदस्य महेंद्र काका यांने मानले

 
Top