उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जागतिकीकरणाच्या आजच्या युगात गुणवत्ता हेच भांडवल बनले असून नौकरी, रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अशावेळी नौकरी मागण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा, असे आवाहन प्राचार्य डॉ अर्शद रजवी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर येथे व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या वतीने 'करिअर मॅनेजमेंट' या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ सुयोग अमृतराव अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यशाळा समन्वयक डॉ. विक्रम शिंदे,  सहसमन्वयक प्रा. सचिन बस्सैये, प्रा. वरुण कळसे उपस्थित होते. यावेळी बिल गेट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्शद रजवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नौकरी व व्यवसायाच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल इंडिया, मेक ईन इंडिया, स्मार्ट सिटी हे सर्वांना उद्योगवाढी साठी मदत करणारे आहेत, असे डॉ. रजवी यांनी संगितले. त्याचबरोबर व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी उस्मानाबाद परिसरात नवीन उद्योगाच्या संधि बाबत मार्गदर्शन केले.उ द्घाटना नंतर प्रमुख व्याख्यात्यांचे मार्गदर्शन झाले यात डॉ. विक्रम शिंदे यांनी ग्रामीण भागातील व्यवसायच्या संधि बाबत मार्गदर्शन केले तर  प्रा. सचिन बस्सैये यांनी व्यवस्थापन शास्त्र मधील संधि व प्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी उपपरिसरचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित व उपकुलसचिव विष्णु कराळे  यांचे मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण परिसरातील विद्याथ्र्याना उच्च शिक्षणातील पुढील पर्याय माहीत करावेत तसेच तृतीश वर्षाचा निकाल लागल्यानंतर होणारी पालकाची व विद्यर्थी यांची धावपळ कमी व्हावी हे उदिष्ट समोर ठेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले तेरणा महाविद्यालय, बिलगेट्स महाविद्यालय, आडव्हान्स महाविद्यालय, व्ही. जे. शिंदे महिला महाविद्यालय, तुळजाभवानी संगणक महाविद्यालय तसेच  ईतर महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया सुकाळे यांनी तर आभार प्रा. वरुण कळसे यांनी मानले.
 
Top