
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागात झालेल्या साडेनऊ कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी विभागीय चौकशीची मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली होती. या मागणी यश आले असून पाच सदस्यांची चौकशी समिती विभागीय आयुक्तांनी नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल एक महिण्याच्या आत येईल, या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी स्तरावरील नगरपालिका प्रशासनात नऊ कोटी ३५ लाख रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत लोकाराज्य ने बातमी प्रकाशीत केली होती. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी चौकशी समिती नेमली, मात्र या प्रकरणाची चौकशी विभागयी आयुक्त स्तरावर होण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली. या समितीला एक महिन्यात अहवाल देण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आदेशीत केले आहे.