तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर येथील तीर्थक्षेत्रात उपअधीक्षक गृह श्रीमती शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. एस. बी. शेळके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. ए. बी. कोवे, पोलीस निरीक्षक तथा बाल कल्याण अधिकारी श्री. हर्षवर्धन गवळी तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर मंदिर परिसरात दि.30जानेवारी रोजी बाल भिक्षेकरी पुर्नवसन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एका अल्पवयीन बाल भिक्षेकरीला ताब्यात घेवून बाल कल्याण समिती, उस्मानाबाद येथे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आले.
 बाल कल्याण समिती मार्फत या बालिकेला पुढील पुर्नवसनाकरिता आपलं घर, नळदूर्ग येथे दाखल करण्यात आले. या मोहिमेचे पथक प्रमुख तुळजापूर पोलिस उपनिरीक्षक श्री. दांडे, दोन पोलीस शिपाई, चार पोलीस शिपाई महिला तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुणे, विधी व परिविक्षा अधिकारी श्रीमती जयश्री भाले, समुपदेशक श्रीमती कोमल धनवडे, सामाजिक कार्यकर्ती श्रीमती प्रज्ञा बनसोडे, सामाजिक कार्यकर्ता श्री. योगेश शेगर, माहिती विश्लेषक श्री. विजय पवार, क्षेत्रीय कार्यकर्ती श्रीमती जयश्री पाटील, चाईल्ड लाईन समन्वयक श्री. गिरी आदी उपस्थित होते.

 
Top