उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 23 नुसार जिल्हा स्तरावर अप्पर जिल्हाधिकारी यांना दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यानुसार आता अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव हे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम पाहतील. दिव्यांग व्यक्तींच्या प्राप्त तक्रारींबाबतचे कामकाज पाहतील, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.
 
Top