उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ते आयुर्वेद महाविद्यालयापर्यंत सायकलिंगचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपनाबाबत जागृती करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, वन अधिकारी श्री.पवार, श्री.रुक्मे, श्री.सचिन पांचाल, श्री.रवि मोहिते, भाऊसाहेब अणदूरकर, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, श्री.नितीन तावडे, चित्रसेन राजेनिंबालकर,  राम ढेरे,  चंद्रशेखर सुरवसे,  मल्हारी माने,  रामदास पाटील,  सूरज कदम, चंदन भडंगे, श्री.रवि शितोले, श्री.संजय चव्हाण, प्रदीप खामकर, शेषनाथ वाघ, डॉ.विशाल वडगावकर, जितेद्र खंडेरिया, रमेश वडगावकर, खंडू राऊत, प्रणव तावडे, खेळाडू अजिंक्य माने, योगेश थोरबोले, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी नितीन व्हटकर, काही शालेय मुले, उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन ग्रुपचे सदस्य, पतंजली योग समितीचे सदस्य, उस्मानाबाद जिल्हा सायकल असोसिएशनचे सदस्य, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, चंद्रसेन देशमुख आदींची उपस्थिती होती.    
यावेळी सूरज कदम, चंद्रसेन देशमुख, नितीन तावडे, चित्रसेन राजेनिंबाळकर आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, सायकलचा वापर आणि इतर काही सामाजिक उपक्रमांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 
Top