उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी आज दि. 5 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व प्रशालेच्या इयता 10 वीच्या विद्याथ्र्यांशी व्हर्च्युअल झूम अॅपद्वारे संवाद साधला. मुलांनीही जिल्हाधिकारींसोबत मनसोक्त गप्पा मारल्या व  आम्ही इ.10 वी च्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवू, असे आश्वासनही दिले.
या वेळी डायटचे प्राचार्य डॉ.आय.पी नदाफ,अधिव्याख्याता बिराप्पा शिंदे, उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी येरमूनवाड, डायट चे आयटी विषय सहायक तानाजी खंडागळे व व्हाईट बोर्ड, हैद्राबाद ची टीम उपस्थित होती.
 
Top