
प्रतिष्ठित व्यापारी आसेफ असहबोद्दीन मुल्ला (39) यांचे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर कळंब येथील तहसीलदार बाबा दग्र्यात दफनविधी करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, व्यापारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. आसेफ मुल्ला हे पत्रकार समीर मुल्ला यांचे मोठे भाऊ तसेच , डिकसळ ग्रामपंचायतचे सरपंच अमजद मुल्ला व पत्रकार परवेज मुल्ला यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, दोन मुली ,आई, बहिण, भाऊ असा परिवार आहे.