उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले. याचा शुभारंभ १० फेब्रुवारी २०२० रोजी सायं ७.३० वाजता लेडीज क्लबच्या मैदानावर सिनेअभिनेते फू-बाई फू फेम, मराठवाडयाचा सुपूत्र संदीप पाठक यांनी 'व-हाड निघाले लंडनला' हा एकपात्री नाटीकाचा प्रयोग सादर करून केला. यावेळी आपल्या अभिनयातून त्यांने अडीच तास रसिक-प्रेक्षकांना खळखळून हसविले. हे नाटक पाहण्यासाठी जवळपास तीन हजारापर्यत प्रेक्षकांची होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. तर कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून प्रतापसिंह पाटील यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ब्रिजलाल मोदाणी विराजमान होते. प्रमुख उपस्थितीमध्ये अॅड. मिलिंद पाटील, इंद्रजित देवकते व डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजयंती महोत्सव समिती के अध्यक्ष योगेश सोन्ने पाटील यांनी केले. आभार आकाश तावडे ने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.शि.म.स. चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वेंद्र मातरम् ने करण्यात आली.
 
Top