उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सोशल मिडीयावर कोरोना आणि चिकन या विषयी अफवा पसरविणा-या व फोटो टाकणा-या व्यक्तीवर कार्रवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उस्मानाबाद जिल्हा पोल्ट्री असोसियेशनच्या वतीने उस्मानाबाद येथील सायबर क्राईम पोलिसांना ११ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हयामध्ये शेतकरी कुकूटपालन हा व्यवसाय मुख्य व्यवसाय व जोड व्यवसाय म्हणून करतात. अनेक चिकन विक्रेते, व्यापारी, शेतकरी,औषध विक्रेते अशा अनेक लोकांचे पोट या व्यवसायावर भरते. परंतू कोरोना व चिकन अंडी यांचा काहीही संबंध नसताना चिकन विषयी सोशल मीडीयावर चुकीचे फोटो व्हायरल केले जात आहेत. यामुळे चिकन विक्रेता, व्यापारी, शेतकरी, औषध विक्रेता यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होवून कोट्यावधी रूपयांचा नुकसाण होत आहे. याकडे लक्ष देऊन संबंधित अफवा पसरविणा-यावर व्यक्तीवर कारवाई करण्याची मांगणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर एस.ए.जंत्रे, एम.एस.डोईफोडे, एम.आर. वरपे, जाधव बळीराम, उमाप हरिभाऊ, धनशाम तौर, जुबेर पठाण आदींच्या स्वाक्ष-या आहेत.