
तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये सलग चौथ्यांदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवलेल्या विठ्ठलसाई कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी गुरुवारी (दि.13) कारखाना कार्यस्थळावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये चेअरमनपदासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी सादिकमियाँ काझी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी यांनी चेअरमनपदी बसवराज पाटील व व्हाईस चेअरमनपदी सादिकमियाँ काझी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शहापूरकर यांनी काम पाहिले.
यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित सदस्य बापूराव पाटील, शरण पाटील, रामकृष्ण खरोसेकर, विठ्ठलराव बदोले, माणिक राठोड, विठ्ठल पाटील, सुभाष राजोळे, केशव पवार, दिलीप पाटील, शरणप्पा पत्रिके, चंद्रकांत साखरे, राजीव हेबळे, संगमेश्वर घाळे, शब्बीर जमादार, शिवलिंग माळी, शिवमूर्ती भांडेकर, दिलीप भालेराव, मंगलताई गरड, इरमाबाई स्वामी आदी उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुरूम नगर पालिकेच्या वतीनेही नूतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. मुरूमच्या नगराध्यक्षा अनिताताई अंबर, उपाध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांनी बसवराज पाटील व सादिक मियाँ काझी यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर, ज्येष्ठ नगरसेवक रशीद शेख, आयुब मासुलदार, सुरेश शेळके, सहदेव गायकवाड, शंभुलिंग पाटील, दिलीप गुंडगोळे, प्रवीण अंबुसे, रतन बने आदी उपस्थित होते.