परंडा/प्रतिनिधी -
 शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये हिंगणघाट येथे झालेल्या जळीत प्रकाराबद्दल जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या, तर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विशाल जाधव, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार माने, डॉ.सचिन चव्हाण, डॉ.मल्हारी शिंदे ,डॉ.बाबासाहेब राऊत, प्रा.सज्जन यादव आदी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हिंगणघाट येथील घटना अतिशय निंदनीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे.ही गोष्ट अतिशय भयानक आहे. सर्वांनी याचा देशभर निषेध केलेला आहे.परंतु ही पीडित महिला परत येणार नाही त्यामुळे येथून पुढे सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचे भान ठेवावे की आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस स्वत: एक जिम्मेदार व्यक्ती समजून एखादी घटना घडत असेल तर त्या घटनेला आपण विरोध केला पाहिजे घटना घडू नये यासाठी आपण दोन हात पुढे केले पाहिजेत यापुढे फुलराणी जळणार नाही ही ही शपथ त्याने सादर केली आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी ती शपथ घेतली.  ती पीडित महिला जगामध्ये पुन्हा येणार नसल्याने ज्या नराधमाने हे कृत्य केले आहे त्याला फाशी झालीच पाहिजे असे यावेळी सर्वांनी आपली मते व्यक्त करत निषेध व्यक्त केला.कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. शहाजी चंदनाशीवे यांनी मानले.

 
Top