उस्मानाबाद/प्रतिनिधी -
 जिल्हा शासकीय रूग्णालयात जागतिक युनानी औषधी दिवस शुक्रवारी (दि.14) विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त युनानी चिकित्सा पद्धती, औषधी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, सहायक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. अबरार अहमद, अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, मेट्रन नलिनी दलभंजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास डॉ. उज्मा सय्यद, डॉ. पल्लवी कोथळकर, भारत हिंगमिरे, फारूक काझी, श्रीमती शिंदे यांच्यासह जिल्हा शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते. .

 
Top