तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील मंगरुळ येथील शेकूम्बर मकबूल शेख यांच्या मुलाचा विवाह संगदरी तालुका दक्षिण सोलापूर येथील हसन सिकंदर जमादार यांच्या मुलीशी शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सर्वच जनतेस "बेटी बचाओ बेटी पढाओ ", "हम दो हमारे दो ", " पेड, पौधे लगाओ प्रदूषण बचाओ ", "हम सब हिंदुस्थानी है ", "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा अशा प्रकारचे समाजोपयोगी व देशभक्तीपर संदेश देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 
 
Top