प्रतिनिधी/ भूम
तालुक्यासह शहरात मंगळवारी (दि.25) दुपारी 1.38 वाजता प्रचंड मोठा गूढ आवाज झाला. अचानक झालेल्या या गूढ आवाजामुळे  भूम शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्याशी संपर्क करून ही माहिती मिळू शकली नाही. शहरासह परिसरामध्ये काही दिवसापूर्वीही असाच गूढ आवाज झाला होता. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.  मात्र, हा भूकंप नसल्याचे लातूरच्या भूकंपमापन केंद्रातून सांगण्यात आले.
 
Top