तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील मंगरुळ येथील  ग्रामदैवत कंचेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाल कलाकारांच्या अदाकारीने रसिक प्रेक्षकांची मने जिंगली.
कार्यक्रमाची सुरवात अंगणवाडी, जिला परिषद कन्या शाळा, इंदिरा कन्या प्रशालेच्या विद्याथ्र्यांनी  विविध गाण्यांवर नृत्याचे प्रस्तुतीकरण केले. सूत्रसंचालन संतोष पवार व आभार  यात्रा महोत्सव समितीचे प्रमुख अजिंक्य सरडे यांनी मानले तसेच या कार्यक्रमात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. साबेर जब्बार शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर  सर्वच शाळेना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 
Top