उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरासह तुळजापूर व शिराढोण पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या तीन गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करत दोघांना गजाआड केले. त्यांच्याकडून टीव्ही, स्कूटर, रोख रक्कम जप्त केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात मिळालेल्या माहितीवरून धर्मराज मारुती गुंजाळ (रा. बीड) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20 हजाराची रोकड जप्त केली. तसेच शिराढोण पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी रावजी बल्लू काळे उर्फ कालिदास (रा. मोहा पेढी ता. कळंब) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेला एलईडी संच जप्त केला. आनंदनगर पोलिस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील टीव्हीएस ज्युपीटर दुचाकी शोधून काढली. यातील आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक डी. एम. शेख, उपनिरीक्षक करण माने यांच्या नेतृत्वाखाली पथकातील कर्मचा-यांनी केली.

 
Top