उमरगा/प्रतिनिधी-
अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद नसल्याने रस्त्यावर अंधारात उभ्या अपघातग्रस्त ट्रकला (एमएच 20 बीटी 0431) लातूर हून येणा-या दुचाकीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.12) रात्री पावणेबाराच्या सुमारास श्री बिरुदेव मंदिर परिसरात घडली.
बुधवारी रात्री लातूर येथून दुचाकीवरून (एमएच 14 डब्ल्यू 3186) आशिष दशरथ पाटोळे (22, रा गुंजोटी, उमरगा), राजू अरविंद साळुंके (22, रा. खाडगाव, लातूर) आणि विजय सीताराम गायकवाड (25, रा. लातूर) येत अपघातग्रस्त ट्रकला दुचाकी धडकली. या घटनेत विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला तर आशिष पाटोळे, राजू साळुंके जखमी असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.