भूम/प्रतिनिधी-
  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी   वैशाली तेलोरे यांच्या उपस्थित भूम शहरातील कसबा येथे आपत्ती व्यवस्थानाच्या पथकाकडून आचानक अपघाताचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी   प्रशासनाच्या अधिका-यांची पळा पळ झाल्याचे चित्र दिसुन आले.
दि.१४ फेब्रुवारी रोजी कसबा येथील नगर पालिका व्यायामशाळा येथील घर अंगावर पडले व माणसे घरात अडकले आहेत, असा संदेश पुलिस स्टेशन, नगर परिषद दवाखन्यात देण्यात आला.  त्यानंतर पोलिस आपल्या टीम सोबत घटनास्थळी दाखील होऊन त्यांनी घरात आडकलेल्या व्यक्तींना बाहेर त्यांना दवाखन्यात अॅडमिट केले. त्यानंतर अग्निशामक दल, होमगार्ड समादेशक १०८ हे वेळेत उपस्थित रहिले. यावेळी प्रत्येक विभाग ने सतर्कता दाखवली.  यावेळी तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रृगांरे, सोनटक्के ,ए.के.कांबळे यांची उपस्थिती होती.

 
Top