उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 महापरीक्षा पोर्टलमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाज्या युवक-युवतींवर मोठा अन्याय होत होता. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार होता.  डमी उमेदवार बसवून अनेकांनी परीक्षा दिल्याच्या घटना वारंवार पुढे आल्या होत्या. तसेच सामुहिक कॉपी, योग्य बौठक व्यवस्था नसणे, वेळेवर परीक्षा न होणे, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, अशा असंख्य कारणांमुळे महापरीक्षा पोर्टल कायमच वादाच्या व संशयाच्या भोवज्यात अडकलेले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुशिक्षीत बेरोजगार युवकांबद्दल संवेदनशिल भूमिका बाळगत महापरीक्षा पोर्टल बंदीचा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे  ुवकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. ठाकरे यांच्या निर्णयाबद्दल तमाम युवकांच्या वतीने उस्मानाबाद युथ फोरमचे संस्थापक अॅड. संजय भोरे यांनी त्यांचे आभार मानले आहे. 
 
Top