
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. विद्याथ्र्यांनी प्रत्येक संकटावर मात केली पाहिजे तसेच स्पर्धा परीक्षा,उद्योग या क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.डॉ.ए.डी जाधव यांनी केले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे गुणवंत विध्यार्थी व कर्मचारी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.डॉ.ए.डी जाधव (जेष्ठ इतिहास तज्ञ व अभ्यासक,सोलापूर) तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे ह्या होत्या. या वेळी डॉ.दत्तात्रय कवडे, प्रा.डॉ.आनंद करडे, प्रा.भरत जगताप, प्रा.रवी चव्हाण, प्रा.जयंत कवडे, प्रा.श्रीकांत गपाट, प्रा.सुनिता डोके, श्री.विशाल महामुनी, श्री.शोएब काझी, इंजि.नंदकुमार कवडे, श्री.योगेश विश्वेकर, श्री.अविनाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विध्यार्थी व कर्मचारी सत्कार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आनंद करडे यांनी केले. पाहुण्याचा परिचय प्रा.जयंत कवडे, सुत्रसंचलन प्रा.सुनील आवारे, प्रा.सुनिता डोके, तर आभार प्रा.रवी चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील ग्रामस्थ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.