कळंब/प्रतिनिधी -
उमरगा तालुक्यातील कसगी व कसगी ग्रुप ग्रामपंचायच्या वतीने उत्कृष्ट शाळा क्षेत्रभेट अतंर्गत जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील 115  विद्यार्थी  व 7 यांनी जिल्ह्यातील  नावारुपाला आलेली उपक्रमशिल शाळा म्हणुन लौकिक मिळवलेल्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे शनिवार दि.8 रोजी सहल  घेऊन आले व शाळेतील विविध उपक्रम ,भौतिक सुविधा, शालेय परिसर ,विद्याथ्र्यांची गुणवत्ता व सर्वांगिण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न याची सर्व माहीती शिक्षक व विद्याथ्र्यांनी जाणुन घेतली.
या सहली मध्ये कसगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दाऊद औरादे, शिक्षक गणपत राठोड,श्रीमती शालीनी सरवदे, शाळा  व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद बमदे,कसगीवाडी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट क्षीरसागर,शिक्षक विजय साळुंके,श्रीमती राजाबाई सरवदे, श्रीमती शालीनी सुर्यवंशी  हे  शिक्षक व 115 विद्यार्थी सहभागी झाले होते .
शाळेतील जेष्ट शिक्षक तथा शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शाळेत चालु असलेल्या विविध उपक्रम व शाळेतील गरजा पुर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले यांची सविस्तर माहीती,  सहलीतील विद्यार्थी व शिक्षकांना सांगितली या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक यांनी शाळा पाहुन समाधान व आनंद व्यक्त केला.
 भाटशिरपुरा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सचिन तामाने शहाजी बनसोडे ,दिलीप पवार  श्रीमती रंजना थोरात यांनी पाहुणे शिक्षक व विद्याथ्र्यांचे स्वागत केले व  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदिप रोटे तर आभार संजय झिरमिरे यांनी मानले .
 
Top