उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
नवी दिल्ली येथील एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त महाविद्यालय संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष एस.व्ही.आर्या यांनी नियुक्ती केली आहे.
देशात एन.सी.टी.ई अंतर्गत 20500 एवढी महाविद्यालये असुन यामध्ये डी.एल.एड.,बी.एड. व एम.एड. यासह अनेक शाखांचा समावेश आहे. एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त महाविद्यालय संघटनेचे पूर्ण देशभर जाळे असून 15 जणांची केंद्रीय कार्यकारणी आहे. यामध्ये पश्चिम विभागातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती झाली आहे हे विशेष.
 महाराष्ट्रात सध्या एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त महाविद्यालय अनेक अडचणींना सामोरे जात असताना शिक्षणक्षेत्रात भरीव कार्य व त्यांच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात असलेल्या शैक्षणिक संस्थाचे जाळे या गोष्टीकडे पाहून त्यांची एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त महाविद्यालय संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षापदी नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खा.सुप्रियाताई सुळे यांच्यासह शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top