उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवडणुक दर तीन वर्षांनी होत असते हा पक्ष व्यक्ती केंद्रीत नाही, त्यामुळे भविष्यात जिल्हाध्यक्ष होण्याची संधी अनेकांना मिळेल, उस्मानाबाद जिल्हा हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला राहिल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष पदी नितीन काळे यांची निवड केल्यानंतर आ.ठाकूर बोलत होते. यावेळी निरीक्षक म्हणून भाजपाचे मराठवाडा संघठन मंत्री भाऊराव देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, आ.राणाजगजितसिंह पाटील, अॅड.मिलींद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड.अनिल काळे, खंडेराव चौरे, अॅड.व्यंकटराव गुंड, अविनाश कोळी, सुधीर पाटील, संताजी चालुक्य, सतीश देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.ठाकूर यांनी मित्र पक्ष राहिलेल्या शिवसेनेवर घणाघाती टिका करत पक्षाचे आमदारच सरकार किती वर्ष राहिल, हे सांगू लागले आहेत. आ.ठाकूर यांनी आपण एका मंत्र्याचे अभिनंदन केल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सरकार किती वर्ष चालेल, दररोज सकाळी उठलो की, कॉंग्रेस का पाठिंबा आहे का ? हे पहावे लागते, त्यामुळे सरकार किती दिवस चालेल या विषयी संशय असल्याचे सांगितले. यावेळी आ.ठाकूर यंानी दत्ता कुलकर्णी यांचे कौतुक केले. तर दत्ता कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रभाकर मुळे यांनी मानले.
सीएए व एनआरसीच्या माध्यमातून विष पेरण्याचे काम
सध्या भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन काम करीत आहेत. परंतू कांही साध्य झाले नाही, केंद्र सरकार ने लागू केलेला सीएए व एनआरसी कायदा भारतीय मुस्लिम नागरिकांच्या विरोधात नाही, तर बाहेर देशातील आलेल्या मुस्लिम लोकांच्या विरोधात कायदा आहे. देशातील आमचे बांधव आहेत, भाजपामध्ये ही मुस्लिम लोक मोठ्या संख्येने आहेत, त्याच्या विरोधात कायदा कसा काय केला जाईल, असा प्रश्र आ.ठाकूर यांनी उपस्थित केला.
विकास कामे व टोल नाक्याकडे लक्ष द्या
यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी नुतन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांना सध्या विरोधी पक्षात आपण असल्यामुळे आपल्याला काम करण्याची भरपूर संधी आहे, जिल्हयातील विकास कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. जिल्हयातील टोल नाक्यावर अन्यायकारक टोल वसूली केली जात आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, यापूर्वी आंदोलन करून कांही लोकांनी लाभ उठविल्याचे सांगून कोणावर अन्याय झाल्यास आपण कोणालाही एकटे सोडणार नाही, एकजूटीने त्याचा मुकाबला करू, असा इशारापण राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला.