उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी येथे "तेरणा जलसेवा" या जलशुद्धीकरण सयंत्र प्रकल्पाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांच्या शुभ हस्ते पार पडले. या उद्घाटन समारंभाला गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे-काळे,सरपंच श्रीमती. वर्षा होगले, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान चे जिल्हा कार्यकारी श्री. नितीन व्हटकर, पिरामल सर्वजलचे व्यवस्थापक श्री.प्रतिभ मिश्रा, टेरिटरी व्यवस्थापक श्री. दीपक कळनकर, पिरामलचे फौंडेशनचे प्रकल्प लीडर श्री.भावेश वाघमारे, श्री अल्ताफ जिकरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्यमंत्री ग्राम विकास प्रवर्तक श्री.अण्णासाहेब चौरे आणि समस्त ग्रामवासी तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट उस्मानाबाद तालुक्यातील सर्व ग्रामपरिवर्तक उपस्थित होते.
श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांचे गावामध्ये  आगमन होताच गावातील प्राथमिक शाळेतील मुले व भरारी महिला उमेद उत्पादक गटातील महिलांनी  जिल्हाधिकारी  श्रीमती मुधोळ-मुंडे यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर  जिल्हाधिकारी  श्रीमती मुधोळ-मुंडे आणि गट विकास अधिकारी  श्रीमती समृद्धी दिवाणे-काळे यांच्या हस्ते  स्वागतबोर्डाचे अनावरण झाले व  आर.ओ. प्लांट चे फीत कापून उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.भावेश वाघमारे यांनी  प्रकल्प सुरुवातीची संकल्पना स्पष्ट केली, तसेच गोपाळवाडी येथे पिरामल फाऊंडेशन व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जागृती महिला ग्राम संघाच्या सहाय्याने तेरणा जलसेवा हे जल शुद्धीकरण संयत्र कार्यान्वित करण्यात आले. सयंत्र हे भरारी महिला उमेद उत्पादक गटामार्फत चालविण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या किंमतीत गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीतून महिला बचतगटाच्या महिलांना रोजगार प्राप्त होणार आहे, अशी माहिती दिली.
सामाजिक दायित्व या प्रेरणेने पिरामल प्रतिष्ठान, अहमदाबाद हे आरोग्य, पिण्याचे पाणी व शिक्षण या निर्देशांकावर कार्यरत आहेत.सध्या भारतातील 21 राज्ये  आणि महाराष्ट्रातील प्रामुख्याने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान सोबत  बुलढाणा, उस्मानाबाद, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी बचतगटामार्फत गाव स्तरावर उपलब्ध व्हावे, यासाठी निरंतर कार्य सुरू आहे.
 प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या उदघाटक  जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे  यांनी मनोगत व्यक्त करताना "सयंत्र युनिट हे अत्याधुनिक असून त्याला पॉवर बॅक-अप असल्याचे आवर्जून सांगत पिरामल फाउंडेशनची प्रशंसा केली. बचतगटाने या उद्योग व्यवसायासोबतच इतर व्यवसाय (शेळी-पालन, दुग्ध-व्यवसाय, शिलाई काम इ.) करावेत असे सांगून  त्यांनी   ग्राम सामाजिक परिवर्तन च्या कामाचे कौतुक  केले व बचतगटांनी  विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,तरुणांनी चैनीच्या वस्तूंकडे न वळता कामावर भर द्यावा,असेही त्या म्हणाल्या
 श्री. दीपक कळनकर यांनी आपल्या भाषणात पिरामल फाउंडेशन द्वारा वितरित आर.ओ. प्लांट चे बचतगटासाठी असलेले व्यावसायिक महत्व व त्याची उपयोगिता स्पष्ट केली, तसेच प्लांट चालविणे बाबत प्रेरित करीत त्याचे रेकॉर्ड आणि शुद्ध पिण्याचे पाण्याचे महत्व सांगितले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी  सरपंच,  गट विकास अधिकारी,  टेरिटरी व्यवस्थापक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक श्री. कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामस्थ श्री. काकासाहेब जगदाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापक, बचतगट प्रमुख व सदस्य, ग्रामस्थ व युवक युवती यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top