लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील मसणजोगी वस्ती मध्ये रा.स्व.संघ जनकल्याण समिती भारतमाता मंदिर प्रकल्पाच्या वतीने रथसप्तमी व जनकल्याण समितीच्या वर्धापनदिनानिमित्ताने भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून वस्तीतील महिलांना हळदी कुंकू व साडी चोळीचे वान  देण्यात आले.
यावेळी न्यु व्हिजन इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ.सविता जाधव,  शिक्षिका सौ.सुलक्षणा जाधव, मोगलम्मा टेकोळे, सविता कलमुले, शशिकला कलमुले, सखु विभुते, रजिता टेकोळे, राधा टेकोळे, पुजा सितारे, यलम्मा कलमुले, अंबु टेकोळे, मोगली कलमुले, चिऊ कलमुले, पुजा कलमुल यांच्यासह वस्तीतील महिला व मुंली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  सुलक्षणा जाधव यांनी मानले.

 
Top