
लोहारा तालुक्यातील हराळी येथे जिल्हा परिषद शाळेत दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षण समितीचे आध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, सरपंच बलभीम सूर्यवंशी, सदस्य अजित सूर्यवंशी, सामजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी, विलास सोनवणे, आच्युत पाटील, मोहन सूर्यवंशी, नागेश गायकवाड, संदीप,घोडके विठ्ठल बिराजदार, जालिंदर सुरवसे, मुख्याध्यापक तात्याराव भालेराव, सहशिक्षीका शितल जाधव, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल जाधव यांनी केले तर आभार अजित सुर्यवंशी यांनी मानले.