उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळयास भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
या वर्षी नव्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले होते. गेल्या ब-यास दिवसापासून बंद असलेला पाण्याचा धबधबा ही सुरू करण्यात आला होता. सायंकाळी शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने शिवप्रेमी नागरिकोंची गर्दी उसळली होती. शहरातील चौका-चौकात शिवप्रतिमांचे पुजन करण्यात आले.
 
Top