परांडा/प्रतिनिधी -
येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण यांना जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन देण्यात आले.१ नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत असलेल्या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना निवृत्ती वेतन योजना अर्थात जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सर्व निवृत्तीवेतन योजना डीसीपीएस धारक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनावर प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ.शहाजी चंदनशिवे ,डॉ. सचिन चव्हाण, प्रा.जगन्नाथ माळी ,डॉ.अक्षय घुमरे, डॉ.महेशकुमार माने,डॉ कृष्णा परभणे, प्रा संतोष काळे, प्रा.दिपक तोडकरी, प्रा.विद्याधर नलवडे आदींच्या सह्या आहेत.

 
Top