उस्मानाबाद/प्रतिनिधी -
अभिनय हा कसदार असावा फसव्या नाट्य संस्थेच्या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यास प्रशिक्षण  घेऊ नये जेणेकरून वास्तववादी अभिनय अंगीकृत होणार नाही त्याचप्रमाणे संस्कार भारती व नाट्य परिषद शाखेने नाट्यांचे कार्य वाढवण्याची गरज असून मराठवाड्याने अनेक दिग्गज अभिनेते, लेखक ,साहित्यिक, कवी रसिकांना दिले आहेत नाटयचळवळीस गती देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन योगेश सोमन यांनी केले.
पद्मश्री हरिभाऊ वाकणकर जन्मशताब्दीनिमित्त संस्कार भारती धाराशिव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या नृत्यातून ध्येय गीताने झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. या गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी सिनेअभिनेते योगेश सोमण, श्रीमती स्नेहलताई पाठक अध्यक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्यसंमेलन हंपी , मकरंद राजे निंबाळकर नगराध्यक्ष नगर परिषद उस्मानाबाद यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. जिल्हा संघटन मंत्री प्रभाकर चोराखळीकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनतर संस्कार भारती दैनंदिनी 2020 चे विमोचन करण्यात आले.
गौरव सोहल संपन्न करण्यासाठी समिती अध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , सचिव सुरेश वाघमारे सुंभेकर, कोष प्रमुख अरविंद पाटील, धनंजय कुलकर्णी , डॉ.सतीश महामुनी, सुधीर पवार ,शरद वडगावकर डॉ.रुपेश जावळे ,मुकुंद पाटील, महादेव केसकर, यशवंत हजारे, अमृत जावळे ,सत्यहरी वाघ ,शुभम चोराखळीकर यांनी परिश्रम घेतले.  जिल्हा सचिव प्रसन्न कोंडो यांच्या गायकीने कार्यक्रमाची सांगता झाली. जिल्हा उपप्रमुख अनिल ढगे व अनिल मालखरे यांनी सूत्रसंचलन केले. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.
सत्काराने सन्मान
कार्यक्रमात मध्ये सुधीर पाटील,युवराज नळे, नितीन तावडे ,डॉ.हर्षल डंबळ, सिद्धार्थ शिंगाडे ,शेषनाथ वाघ ,महादेव सस्ते, विशाल शिंगाडे , सौ.संगीता पाटील, कु.दिपाली नायगावकर, कु. कृष्णाई उळेकर , कु. शुभदा रविकांत पंडित, प्रज्योत प्रशांत कावरे यांचा सत्कार करण्यात आला. 
 
Top