उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संविधान बचाव संघर्ष समिती उस्मानाबादच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी एनआरसीच्या विरोधात सोमवार दि. 3 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी या काद्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिलाधिका-यांना आपले मागणी निवेदन देण्यात आले.
यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकते  व बहूजन समाजाचे नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो जोपर्यंत सीएए कायदा रद्द होत नाही व एनआरसी कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत उस्मानाबाद शहरात हे उपोषण चालू राहणार आहे असे संयोजकाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

 
Top