परंडा /प्रतिनिधी-
विद्यालयात कायदे विषयक शिबीर आयोजित केले होते. या वेळी न्यायमुर्ती एस.जी.बावकर(दिवानी न्यायाधीश वरिष्ठस्तर), एम,आर,सोवणी (दिवानी न्यायाधिश), एस,पी राचकर  (न्यायाधिश), देवकर व्ही.डी (अध्यक्ष-विधीज्ञ मंडळ परंडा),अॅड सूर्यवंशी एन,व्ही, अॅड. ए.एम शेख, अॅड. गोविंद कोटुळे, अमोल अंधारे सर, जगदीश करपे. यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला.
अॅड सूर्यवंशी एन.व्ही.यांनी साइबर क्रक्राईम विषयी अनमोल मार्गदर्शन केले.अमोल अंधारे सर यांनी (पाणी आडवा पाणी जिरवा) व पाणी फाऊंडेशन या विषयी माहिती दिली. न्यायमुर्ती एम.पी.राचकर यांनी वायु प्रदुषण ध्वनी प्रदुषण या विषयी माहिती दिली. तसेच न्यायमुर्ती एस.जी.बावकर यांनी (6 ते 14 वयोगटामधील मुलांना मोफत आणी सक्तीचे शिक्षण) या विषयी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  नारायण खैरे सर यांनी केले. सुत्रसंचन.विकास वाघमारे सर यांनी केले.आभार प्रदर्शन नागनाथ काळदाते सर यांनी केले.

 
Top