उस्मानाबाद/प्रतिनिधी-
एसएससी परीक्षा तुमच्या आयुष्यातील पहिली सार्वजनिक परीक्षा आहे. आज पर्यंत तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या छत्राखाली सुरक्षित जीवन व्यतीत केले आहे. पुढील आयुष्य अतिशय धकाधकीचे आणि अनेक आव्हानांनी भरलेले जीवन आहे. स्वत:ची कसोटी आणि चिकाटी ज्ञान प्राप्ती साठी आवश्यक असते. प्रामाणिकपणा आणि सचोटी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे  यांनी केले.
उस्मानाबाद येथील सिटी प्राईड इंग्लिश शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्याथ्र्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक एस. ए. सय्यद सर होते. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्याथ्र्यांनी शाळेप्रति आपले ऋण व्यक्त केले. प्रशालेची निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्याचे वचनही त्यांनी याप्रसंगी दिले.  संस्थेचे अध्यक्ष इकबाल सय्यद आणि प्रशालेतील सर्व शिक्षकांनी दहावीच्या विद्याथ्र्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता नववीच्या विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.

 
Top