लोहारा/प्रतिनिधी-
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन लोहारा तालुक्यातील धानुरी, करंजगाव, रस्त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल धानुरी येथील शेतक-यांनी लोहारा गटविकास अधिकारी अशोक काळे यांचा सत्कार केला. धानुरी करजगाव या रस्त्यासाठी मंजुर झालेला रस्ता अन्यत्र करुन डांबरीकरणाचे कामात 70 लाख रुपयांची अनियमितता करण्यात आली होती. सदरील रस्ता पाणंदमुक्त करुन मजबुतीकरण करण्यात यावे यासाठी धानुरी येथील शेतक-यांनी जिल्हा परिषदपासुन मंत्रालयापर्यंत वेगवेगळे आंदोलनाने केली होती. यानंतर जिल्हा परिषदेने शेष फंडातुन 8 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधुन पहिल्या टप्प्यातील 1 किमी रस्त्यासाठी 11 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी वर्गातून वर्षानुवर्षे करण्यात आलेल्या शेतरस्त्याचे काम मंजूर केल्याबद्दल धानुरी येथील शेतक-यांनी लोहारा गटविकास अधिकारी अशोक काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. एस. निंबाळकर, कनिष्ठ सहाय्यक डी. एन.जायफळे, विठ्ठल बुरटुकणे, माजी उपसरपंच बालाजी वडजे, संभाजी मुसांडे, विजय साळुंके, गहिनीनाथ साळुंके, गुंडु पाटील, तात्याराव साळुंके, मनोज साळुंके, बबु देशमुख, परमेश्वर साळुंके, अजित मुसांडे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 
Top