परंडा/प्रतिनिधी -
विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त परंडा येथे खुल्या कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांनी केले आहे . या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुजितसिंह ठाकुर, माजी आ . ज्ञानेश्वर पाटील, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चंद्रशेखर शिखरे, जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांच्या हस्ते सोमवार ( दि. 17 ) करण्यात आले .
यावेळी माजी सभापती गौतम लटके , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड . संतोष सुर्यवंशी ,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल , अॅड सुभाष मोरे , सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत घुमरे,मुकुल देशमुख ,भागचंद नेटके , नवनाथ जगताप, जि .प. माजी सदस्य सिध्देश्वर पाटील,रिपाईचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, माजी उपसभापती मेघराज पाटील, धनंजय मोरे, अॅड . गणेश खरसडे,विश्वास मोरे , सतीश दैन , राहुल बनसोडे , अॅड . जाहिर चौधरी , शिवाजी कदम , लहु गाडे , दिपक भांडवलकर , सचिन खरसडे , हभप दत्ता रणभोर, नगरसेवक शाबीर सौदागर,बाशा शहाबर्फीवाले, बबन जाधव, प .स. सदस्य सुधाकर कोकाटे, नामदेव भाग्यवंत,  गुलाब शिंदे, राजेंद्र वाघमारे, अॅड . रणजित खरसडे आदि उपस्थित होते .पंचायत समीती कार्यालय प्रांगणात  स्पर्धचे आयोजन करण्यात आले आसुन तिन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी  राज्याच्या विविध भागातून 25 कबड्डी  संघांने सहभाग नोंदवला आहे . यावेळी मान्यवरांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले . तसेच रांगोळी व सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली . संयोजक काकासाहेब साळुंके , भाऊसाहेब खरसडे, अंगद धुमाळ,मराठा सेवा संघाचे ता .अध्यक्ष शाशीकांत जाधव , संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष  मनोज कोळगे , ता कार्यध्यक्ष समाधान खुळे,देवानंद टकले , संभाजी ब्रिगेडचे ता .अध्यक्ष राजकुमार देशमुख , हरिश्चंद्र मिस्कीन, अप्पा काशीद , गणेश राशनकर , रवि मोरे , मलीक सय्यद ,बापू मांडवे , रामचंद्र गोडगे, रविंद्र बारसकर, प्रा . सुभाष मारकड , नारायण खैरे ,भगीरथ गोडगे,महादेव गिरी ,अनिल देशमुख ,अमोल गोडगे, पांडुरंग कोकाटे , नाना मांडवे, धर्मराज गटकुळ, महेश खुळे , शहाजी कोकाटे आदि परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाहिर शरद नवले व समाधान खुळे यांनी केले .
असे होणार पारितोषिक वितरण 
कबड्डी चषक स्पर्धेतील प्रथम बक्षीस 51 हजार काकासाहेब साळुंके यांच्या वतीने, द्वितीय 31 हजार भाऊसाहेब खरसडे यांच्या वतीने, तृतिय 21 हजार अंगद धुमाळ यांच्या वतीने, चौथे 11 हजार देवानंद टकले यांच्या वतीने तसेच उत्कृष्ट चढाई 5 हजार मलिक सय्यद, उत्कृष्ठ पकड 5 हजार संजय काशीद, अष्टपैलु खेळाडू 5 हजार शशिकांत जाधव, शिस्तबध्द संघ 5 हजार  मनोज कोळगे यांच्या वतीने बक्षीस ठेवण्यात आले आहे
 
Top